shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पशुपालक शेतकऱ्यांसाठी आज जनावरांचा बाजार सुरू ; सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचा पुढाकार

प्रतिनिधी : स्वामीनाथ हरवाळकर       

अक्कलकोट दि . २० /  आठ महिन्यापासून बंद असलेले अक्कलकोटचे जनावरांचे बाजार शेतकरी नेते स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने आज उघडण्यात आले.

      जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी देऊनही अक्कलकोटचे ढिम्म बाजार समिती प्रशासन जनावरांचे आठवडी बाजार सुरू करण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेतकरी पशुपालक यांच्यापुढे अनेक अडचणी येत होत्या.अखेर बाजार समिती सभापती संजयकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधून आज सोमवारपासून आठवडी बाजार सुरू केले.

      गेल्या दोन महिन्यांपासून पशुपालक मार्केट यार्डाच्या गेटपुढेच भर रस्त्यावर कमी जागेत बाजार भरवत होते. त्यामुळे अपघात आणि कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला होता,त्यामुळे मार्केट यार्डाचे गेट उघडून पशुपालकाना आत घेण्यात आले.पुढील सोमवार पासून सर्व पशुपालक,शेतकरी,व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामींनाथ हरवाळकर यांनी केली आहे.

     या वेळी वलिअहमद कुरेशी,चिदानंद हलसंगी,इस्माईल नदाफ, बाबू घंटे,कांतू पुजारी, रमजान बेपारी, शिवू पुजारी,विजू व्हानमाने,राजू कंटोळी, बिरप्पा घोडके, राम गलोळी,सलीम कामळीवले आदी शेतकरी,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close