shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ : महाराष्ट्र शासन राजपत्र जाहीर..!!

अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे ; उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश सावंत..!!


शिर्डी | दि. १८ प्रतिनिधी : देशात दुसर्या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उपाध्यक्षपदी ॲड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून शिर्डी संस्थानचा कारभार प्रशासकीय मंडळाकडे न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ समितीमार्फत पाहिला जात होता. मात्र काही महिन्यांपूर्वी पूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने गुरुवार (दि. १६) रोजी राजपत्र जाहीर करून कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी त्यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. 





बारा विश्वस्तांपैकी नऊ विश्वस्त हे नगर जिल्ह्यातील आहेत. संस्थानच्या अध्यक्षपदी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत, असे बंधन न्यायालयाने घातले आहे. त्यानुसार आमदार काळे यांची अभियांत्रिकी क्षेत्रातून तर सावंत यांची कायदा क्षेत्रातून ही निवड करण्यात आली असल्याचे शासनाच्या राजपत्रात म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील अनुराधा आदिक (महिला, श्रीरामपूर), सुहास आहेर (कायदा, संगमनेर), अविनाश दंडवते (अभियांत्रिकी, राहाता), सचिन गुजर (अभियांत्रिकी, श्रीरामपूर) यांची तज्ज्ञ संवर्गातून तर सुरेश वाबळे (राहुरी), राहुल कनाल (मुंबई), माजी आमदार जयवंतराव जाधव (नाशिक), महेंद्र शेळके (शिर्डी), एकनाथ गोंदकर (शिर्डी), यांच्यासह शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांची पदसिध्द विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तकेलेल्या बारा विश्वस्तांपैकी नऊ विश्वस्त है नगर जिल्ह्यातील आहेत. तर पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

close