श्रध्दांजली ..
(शामसुंदर शहाणेजी)
लखलखता प्रकाश
झालाअंती सूर्यास्त
शहाणे शाम सुन्दर
होती वैकुठांसनस्त
उदाहरण असे हवे
अधिकारी विश्वस्त
निष्काम कर्म योगी
भक्त राही आश्वस्त
साईनाथकृपाप्रसाद
मिळे तया मुक्तहस्त
आगळे व्यक्तीमत्व
सेवे सदोदित व्यस्त
मंदिर परिसर देईलं
सत्कर्माची त्या दस्त
रिकामे वाटेलं सर्वां
अशीआपणा भिस्त
श्रीरामपूर भूषण ते
व्यक्तीमत्व भारदस्त
साईआशीष तुम्हांस
मिळे सदा मुक्तहस्त
साई दर्शन व्यवस्था
साक्ष देई स्वयंशिस्त
आपलीआठवण ती
घालत राहीलं गस्त
2
शामसुंदरजी ..
वैकुंठा करी प्रयाण
शहाणे शाम सुन्दर
दुःख असेअनन्वित
तळमळे साई सागर
उदाहरण एकमेव हे
असेअसावे विश्वस्त
निष्काम कर्म योगी
भक्त राही आश्वस्त
साई अन् जनतेतला
दुवासाधला मनोहर
ते संपर्क अधिकारी
पद भुषले खरोखर
मन निर्मळ निरामय
स्वच्छ तसा परिसर
सेवेत सदैव व्यस्त
कमी पडला अवसर
साई दर्शनास जाता
जाणव तुमचा वावर
बाकी सारेअनिश्चित
साई भक्तीचं स्थावर
साईनाथ आशीर्वाद
कृपा छत्र डोक्यावर
वाहताना श्रध्दांजली
दुःखअतिव अनावर
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..
www.kavyakusum.com

