प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई :- सोनई येथे, छत्रपती नगर सार्वजनिक तरुण मंडळ,तसेच अशोका ज्ञानदीप ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सोनई येथील सामाजिक संस्थेच्या वतीने युवकांनी एकत्रित येऊन रक्तदान केले, व सोनई शहरात नागरिकांनी गणेशोत्सव निमित्त " आरोग्य उत्सव अंतर्गत अर्पण ब्लड बँक रक्तपेढी च्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
सदर मोहिमेत तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरात 75 युवकांनी पुढाकार घेतला आहे.
येत्या गणेश उत्सवात अश्याच प्रकारच्या विविध कार्यक्रम राबवून सर्व गणेश उत्सव मंडळांनी सामाजिक कार्यक्रम राबवावा असा संदेश संदिप अशोक कुसळकर यांनी दिला.
या रक्तदान शिबिरात मुकुंद मंगल कार्यालय चे मालक सनी पिसाळ यांनी विशेष सहकार्य केले. सदर रक्तदान शिबिर उत्साहात पार पाडण्यासाठी अनिल निमसे, दिशांत भालेकर,उदय दळवी , अविनाश कुसळकर , सचिन बनकर ,प्रसाद दरंदले, अविनाश बनकर, रुपेश कुसळकर, संदिप दरंदले आदींनी परिश्रम घेतले.
सर्व तरुण युवकांचे आभार प्रसाद दरंदले यांनी आभार मानले.

