नियमावली लोकांच्या फायद्यासाठी असावे - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उद्देशून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, ,महावितरणची नियमावली अतिशय कडक आहे . नियमावली ही लोकांच्या फायद्याची व फायद्यासाठीच असावे. कोरोना काळात शेतकरी अनेक अडचणीत
आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीवर मार्ग काढला पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना यांना उद्देशून भरणे म्हणाले, शेतकरी खूप अडचणीत आहेत. त्यामध्ये कोरोनाचे संकट असल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांची पिके चांगली येत आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात शेतकऱ्यांना येणे कमी आणि देणे जास्त आहे. वीज बिलासंदर्भात तुम्ही वीज तोडीचा झटका दिल्याने आत्ता लाईट बिल दिले पाहिजे हे शेतकऱ्यांना कळाले आहे. जे शेतकरी बिल भरू शकतात त्यांनी भरावे व ज्या शेतकऱ्यांना बिल भरण्यासाठी पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांनी हप्त्याने बिल भरावे. ऊस, द्राक्षे ,डाळिंब इत्यादी पिकांचे पैसे दिवाळीनंतर येत असतात तसेच उसाचे पैसे साधारणत डिसेंबर नंतर जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये येतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलासंदर्भात टप्प्याटप्प्याने बिल वसूल करावे. शेतकरी हा अतिशय प्रामाणिक आहे. त्याला डिसेंबर पासून हप्ते बांधून द्या आणि त्याची वीज खंडित करू नका असे उद्गार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भादलवाडी येथील उच्च दाब वितरण प्रणाली योजना उपकेंद्र अंतर्गत नवीन ३३/११ केवी उपकेंद्राचा उद्घाटन समारंभ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते तसेच ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि.१४ सप्टेंबर) रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांना संबोधित करताना भरणे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, वैशाली पाटील, अभिजीत तांबिले, हनुमंत बंडगर, पुणे जिल्हा विद्युत मंडळ चे सदस्य स्वप्नील सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. परंतु महावितरण ही सरकारी कंपनी आहे व सरकारची भुमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. महावितरणच्या आधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधुन द्यावेत तसेच पाणी पुरवठयाचे व स्ट्रीट लाईटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडु नये अशी सुचना उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे बोलताना व्यक्त केले.
या वेळी बोलताना खा सुप्रिया सुळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुणे जिल्हा परिषदेतील कामामुळेच राज्यमंत्री भरणे आमदार झाल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निधीची दिला जाईल असे या वेळी सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

