shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची ६३ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न..!!

शिर्डी प्रतिनिधी :
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची सन २०२०-२०२१ ची वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२८.०९.२०२१ रोजी कोरोना-१९ च्या अनुशंगाने शासनाच्या नियमाचे पालन करून संस्थेच्या कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. होत्या नियोजीत अध्यक्षाना अध्यक्षस्थान स्विकारण्याची सुचना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री यादव माधव कोते पा. यांनी मांडली त्यास संचालक श्री तुषार सुदामराव शेळके पा. यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभेच्या नियोजीत अध्यक्षा व विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारुन दिवंगतांना श्रध्दाजली अर्पण केली सभेमध्ये एकुण वीस विषय चर्चेसाठी घेवून त्यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषय आवाजी मतदाने सर्वानुमते संमत करण्यात आले. 


संस्थेच्या विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले त्यात नियोजीत अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्विकारणेस विनंती करणे, श्रध्दाजंली ठराव, सेवानिवृत्त संस्थान कर्मचाऱ्यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार, बँक कॅशक्रेडीट कर्ज नुतणीकरण, लेखा परिक्षक व टॅक्स सल्ल्लागार व लेखापरिक्षक नेमणुक, आर्थिक पत्रके व आर्थीक अंदाज पत्रकास मान्यता, उपविधी दुरुस्ती, सभासद कर्ज वितरण, नैसर्गीक मृत्यु विमा घेणे, मकर संक्रांत हाळदी कुंकू समारंभाचे आयोजन, दिपावली सप्रेमभेट वस्तु व शिधा वाटप, नफा वाटणी, में. डिव्हिडंड, ठेव व्याज वाटप, संस्थेच्या साईज्योत इमारती बाबत विचार करणे, सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापात करणे तसेच ऐनवेळच्या विषयांवर चर्चा होवुन सर्व विषय आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. 

मेंबर डिव्हिडंड १५%, सभासद ठेव व सेवक ठेवीवर ८% व सभासद वर्गणीवर १०% प्रमाणे व्याजाचे वाटपास आवाजी मतदानाने सर्वानुमते मान्यता देण्यात आली. संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पा. यांनी विषय पत्रिका, मागील सभेचे प्रोसिंडींग, आर्थीक पत्रकांचे वाचन करून संस्थेच्या आर्थीक परिस्थितीची माहिती दिली. सदर प्रसंगी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे व्हा. चेअरमन श्री दिनेश दिलीप कानडे, संचालक श्री यादव माधव कोते पा., श्री प्रतापराव संपतराव कोते पा. श्री तुषार सुदामराव शेळके पा., श्री दिपक भाऊसाहेब धुमसे, श्री संदिप भाऊसाहेब बनसोडे, तज्ञ संचालीका सौ. निर्मला दिगंबर सलगरकर, संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे पा., सहसचिव श्री विलास गोरख वाणी पा. उपस्थित होते. शेवटी संचालक श्री प्रतापराव संपतराव कोते पा. यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.
close