shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमचे मेंबर मित्र परिवार यांनी जपली आरोग्य विषयक सामाजिक बांधिलकी.डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात प्रभाग क्रमांक दोन वडार गल्ली येथील धुराडी मशीनने सर्व गल्लीबोळात केली औषध फवारणी .

आमचे मेंबर मित्र परिवार यांनी जपली आरोग्य विषयक सामाजिक बांधिलकी.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात प्रभाग क्रमांक दोन वडार गल्ली येथील धुराडी मशीनने सर्व गल्लीबोळात केली औषध फवारणी .
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२५ सप्टेंबर २०२१)सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना काळ असतानाही सध्या डेंगू, चिकनगुनिया हा रोग वाढत्या डासांच्या प्रभावामुळे या रोगाचा प्रसार होत असल्याचे निदर्शनात येत असल्याने यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील वडार गल्ली येथील गल्लीबोळात घरोघरी फोग मशीनच्या द्वारे(धुराडी द्वारे) डेंगू ,चिकनगुनिया चा रोगाचा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी (दि २४ सप्टेंबर २०२१ )रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान धुराडी मशिनच्या साह्याने फवारणी करण्यात आली.
सदर फवारणी डासांमार्फत होणाऱ्या साथ रोगांचा प्रादुर्भाव सदर भागातील नागरिकांना होऊ नये यासाठी प्राथमिक स्वरूपातील उपाय योजना म्हणून आमचे मेंबर मित्र परिवार इंदापूर या मधील सर्व सदस्यांनी विचार करून या ठिकाणच्या नागरिकांना अशा रोगांपासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक आरोग्यदायक बांधिलकी जपण्याचा विशेष प्रयत्न  दोन तास धुराडी फवारणी करून केल्याने त्यांच्या या कार्याचा विशेष कौतुकही येथील नागरिकांसह इंदापूर शहरामध्ये होत असल्याचे दिसून येते आहे.
आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने यापूर्वीही अनेक वेळा अनेक उपक्रमातून येथील नागरिकांना आरोग्यदायक व सामाजिक कार्यातून आपली सहकार्याची भूमिका पार करताना  दिसते आहे.
धुराडी फवारणी करीत असताना आमच्या मेंबर मित्र परिवाराचे जनसेवक अनिल पवार, अनिल नानासो धोत्रे, लखन चौगुले कल्याण पवार, शिवराम पवार ,रोहिदास(बॉस) पवार, अविनाश चौगुले, पिंटूसेठ घोडके, सुधीर पारेकर आरोग्य विभाग कर्मचारी नगरपालिका यांचे योगदान लाभले.
close