shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस द्या. .. पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली मागणी.

बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस द्या. 


 पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली मागणी.


इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्याकडे असलेल्या बौद्ध समाजातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वहिवाटीस देण्याची मागणी पीपल्स रिप – ब्लिकन पक्ष (कवाडे गट) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे.या मागणी संदर्भातील लेखी निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.


सदर निवेदनात म्हटले आहे की, मौजे रांझणी ता. माढा जि. सोलापूर येथील बौद्धसमाजातील भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. या भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या १५० आहे. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने उदरनिर्वाहसाठी त्याच्या त्यांना कसण्यास द्यावी. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या वहिवाटी सुरु आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून अडचण येताना दिसून येत नाही परंतु आमच्या भूमिहीन बांधवांना जातीवादी प्रशासनाकडून वहिवाटीस मज्जाव केला जात आहे व गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे संजय सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.



प्रशासनाने तात्काळ बौद्ध समाजातील भूमीहीन शेतकऱ्यांना दि.२० सप्टेंबर पर्यंत उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्र या आराखड्या मधून वगळून त्यांना त्या जमिनी कसण्यासाठी द्याव्यात अन्यथा अन्यथा दि.२१सप्टेंबर पासून अभियंता कार्यकारी उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांच्या गेट समोर सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व शेतकऱ्यांसमवेत बेमुदत धरणे आंदोलना केले जाईल असे संजय सोनवणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

close