दिनांक 05/09/2021,
पुणे (शिरूर) :-आज शिक्षकदिनाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा "आचार्य भवन" प्रितम प्रकाश नगर येथील सभागृहात पार पडली. सदर सभेत अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या अध्यक्ष पदाच्या प्रस्तावावर चर्चा होऊन सर्वानुमते संभाजी धुमाळ यांची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. त्यानंतर धुमाळ यांच्या कडे संस्थेच्या अध्यक्ष पदाचा कारभार सोपविण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी धुमाळ यांचा सत्कारकल्याण कोकाटे सर, स्वामी समर्थ फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. प्रविण बा. चोळके, आरोही कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायंन्स यांच्या प्राचार्या डॉ. योगिता चोळके यांनी केला व धुमाळ यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी विशाल कडू सर , अरविंद महाजन सर व इतर शिक्षक उपस्थित होते.

