shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करोनाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करून प्रथमिक शाळा सुरू करावी-अशोक सब्बन



अहमदनगर  I प्रतिनिधी :-
नगर तालुक्यातील मौजे नांदगाव शिंगवे येथील सजलपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी, पालक,गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मा. सखाराम सरक,भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन,ॲड. कारभारी गवळी ,शाहिर कान्हू सुंभे याच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गाऊन विद्यार्थ्यांनी शासनास प्राथमिक  शाळा सुध्दा करोनाची काळजी व प्रतिबंधक उपाय योजनांचे आम्ही  पालन करू अशी ग्वाही देत शाळा उघडाव्यात अशी मागणी  केली.

शाळेत मोठ्या प्रमाणात असलेल्या आदिवासी मुलांना शाळा त्वरीत सूरू होण्याची उत्सुकता  वाटते आहे. शैक्षणिक पालकशाहीच्या आंदोलनास यश आले असून मुख्यमंत्र्यांनी 4 ऑक्टोबर पासून शाळा उघडणार असल्याचे जाहीर केले. त्याचे स्वागत ही करण्यात आले.
close