shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र पवार यांचा अभिष्टचिंतन दिन उत्साहात.

रेडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र पवार यांचा अभिष्टचिंतन दिन उत्साहात.

इंदापूर प्रतिनिधी:रेडा गावचे सुपुत्र मच्छिंद्र महादेव पवार यांचा दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी रेडा व इंदापूर या ठिकाणी सन्मान करून साजरा करण्यात आला.
तसेच रेडा गावामध्ये  उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन दिन रेडा गावातील श्री संत गुलाब बाबा मंदिर या ठिकाणी उत्साहात साजरा केला.
 यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर श्री संत गुलाब बाबा ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर , नीरा-भीमा कारखान्याचे संचालक बबनभाऊ देवकर, किसन देवकर, राजेंद्र देवकर,.  ॲड. योगेश देवकर,पोपट देवकर, आत्माराम देवकर, सिद्धेश्वर देवकर, हनुमंत देवकर, विठ्ठल देवकर, उमेश देवकर, रामभाऊ देवकर, विकास देवकर, सचिन जगदाळे, अमोल सकट, प्रवीण साळुंखे, तुकाराम पवार, राजेंद्र पवार, पत्रकार कैलास पवार, लखन पवार, राहुल पवार, मंजुळे, इत्यादी उपस्थित होते. 
या अभिष्टचिंतन दिनाच्या सत्कार समारंभाचे आयोजन ग्रामपंचायत रेडा चे सदस्य धनाजी गायकवाड, युवा नेते नानासाहेब देवकर, तुकाराम सोनटक्‍के, सोमनाथ देवकर  यांनी आयोजित केले होते.
यावेळी भटके-विमुक्त संघटनेचे तानाजीराव धोत्रे, प्रहार जनशक्ती संघटनेचे अनिल मोहिते हे आवर्जून उपस्थित होते. 
 इंदापूर शहरातील आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार, पिंटूशेठ घोडके, रोहिदास पवार, बाबासाहेब विटेकर, अनिल चौगुले, किरण पवार, सोनबा चौगुले लखन चौगुले यांच्या वतीने केक कापून बाबा चौक येथे अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला .
दिवसभर अनेक मान्यवर यांच्या वतीने अभिष्टचिंतन दिनानिमित्त सत्कार करून सन्मान सोहळा करण्यात आला.
मच्छिंद्र पवार हे शांत संयमी , गाव, समाज आणि अडी-अडचणी मधील लोकांना मदत करणारे सेवाभावी व्यक्ती असल्याचे उपस्थित ग्रामस्थांच्या शुभेच्छा तून व्यक्त झाले. तसेच ते मागील पाच वर्षांपूर्वी रेडा ग्रामपंचायतीचे अभ्यासू आणि गावातील सर्व अडचणी सोडविण्यास संदर्भातील तळमळीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच त्यांच्या या कामाचा आणि गावातील तळमळीचा विचार करून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. राजश्री मच्छिंद्र पवार या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या माध्यमातून गावातील अनेक विकास कामामधील निर्णयामध्ये सहभाग झालेला असल्याचाही यावेळी सांगण्यात आले.  त्यांच्या माध्यमातून इंदापूर शहरात व तालुक्यात सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या समाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्या कार्यरत असल्याचाही गौरव उद्गार यावेळी काढण्यात आले .अशा या परिवारातील मच्छिंद्र पवार त्यांच्या २मुली उच्चशिक्षित तसेच मुलगाही उच्चशिक्षित आहे. 
 मच्छिंद्र पवार हे अनेक समाजातील गरजूंना विविध माध्यमातून हातभार लावून मदत करतात. त्यांनी अनेक परिवारांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक पद्धतीने उभारी देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांचे संबंध घरातील प्रत्येक व्यक्ती सह सर्व मित्र परिवारामध्ये आपुलकीचे शांत संयमी स्वरूपातील असल्याने प्रत्येकाला आपले आपलेसे वाटतात. अशा या व्यक्तीचा ५४ वा अभिष्टचिंतन दिन आनंदमयी वातावरणात संपन्न झाला
close