वरिष्ठ पातळीवरून लक्ष देणे गरजेचे - गुलाबराव बागल सर
प्रतिनिधी : किसन कांबळे
करमाळा : दि . १२ / शासनाच्या बांधकाम विभाग खात्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बागल यांनी सांगितले आहे.
टेंभुर्णी - करमाळा - अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र 516-a टेंभुर्णी ते जातेगाव सोलापूर जिल्हा हद्दचे काम सुरू होणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास मिळून देणे बाबत राज्यमंत्री सा.बां.महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा दत्तात्रयजी भरणे यांना निवेदन दिले होते .
दि.14-08-2021 रोजी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग कार्यालय सोलापूर कदम यांना कार्यवाही साठी निवेदन दिलेले होते.त्या अनुशंगाने आम्ही कदम यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की या रस्त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समवेत झालेल्या बैठकी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम खात्याने 2 महिन्यात राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास सदर रस्त्याचे कामकाज करण्यासाठी ना हरकत प्रमापत्र देण्यात यावे असे अजितदादा पवार यांनी तोंडी आदेश दिलेले होते त्यास आता 2 महिने पूर्ण होऊन गेले आहेत . परंतु महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभाग खात्यातून अद्यापपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास दिले गेलेले नाही . प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचे कदम यांनी आम्हास असे सांगितले की महाराष्ट्र शासनाकडून सदरचे काम चालू करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच आम्ही त्वरित काम सुरू करण्यास तयार आहोत.
तरी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टेंभुर्णी ते जातेगाव या राष्ट्रीय महामार्गच्या टप्प्याचे काम सुरू करणेसाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयी आपल्या वरिष्ठ पातळीवरून व्यक्तिशः लक्ष घालून प्रयत्न करावेत अशी विनंती गुलाबराव बागल यांनी केली आहे.

