प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी - दि 30 जुलै रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला .हा हल्ला धारदार कोयत्याने केला गेला. या हल्ल्यामध्ये कल्पिता पिपंळे यांची हाताची बोटे कापली गेली, तसेच डोक्यात देखील मोठी जखम झाली. या घटनेचा निषेद करण्यासाठी केज नगरपंचायत अधिकारी , कर्मचारी यांनी केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांना निवेदन देऊन ,काळ्या फिती लावुन पुर्ण दिवस लेखणी बंद अंदोलन केले. ज्या माथेफिरु ने सहाय्यक आयुक्तावर हाल्ला केला त्या हाल्लेखोरास काठोरातील कठोर शासन करावे हि मागणी प्रामुख्याने या निवेदनामध्ये नमुद केली आहे . या अंदोलनामध्ये केज नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता. सदरील लेखनी बंद अंदोलनामुळे केज नगरपंचायतची सर्व कामे दिवसभरासाठी कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
ठाणे महानगरपालिकाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. __ अझीम इनामदार न. प. कर्मचारी केज.



