shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट लिलाव पुर्ववत ! जुन्या प्रचलित पद्धतीप्रमाणे काम सुरु ठेवण्यांत यावे -माजीमंत्री कर्डिले


प्रतिनिधी । राधेश्याम कुसमुडे :
अहमदनगर: ०३ सप्टेंबर     
वाराई हमाली अर्थात लोंडींग हमाली ट्रक मालक यांनी द्यावी की खरिददारांनी द्यावी असा तिढा सध्या महाराष्ट्रात उपस्थित झालेले आहे. त्या अनुषंगाने आज वाराई हमाली बाबत संयुक्त मिटींग अहमदनगर बाजार समिती सभागृहात​ माजी नामदार शिवाजी कर्डिले यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. 

त्यावेळी  अहमदनगर (नेप्ती) उपबाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सचिव अभय भिसे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, अहमदनगर​ जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर शिकरे, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा सानप, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला की, होऊ घातलेल्या राज्य पातळी मिटींग दि.०७/०९/२०२१ रोजी संपन्न होत आहे , त्यामधील निर्णयाप्रमाणे दि.०८/०९/२०२१ रोजी पुनः अहमदनगर येथे बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यांत येईल. तोपर्यंत जुन्या प्रचलित पद्धतीप्रमाणे काम सुरु ठेवण्यांत यावे असे माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी आवाहन केले आहे. 

त्यामुळे शेतकरी बांधवानी जिल्ह्यातील सर्व बाजार समिती सुरु असल्याने नेहमीप्रमाणे आडतदार यांच्याशी संपर्क करूनच कांदा मार्केट कमिटीत आणावे. उद्या शनिवार घोडेगाव उपबाजार समिती बंद आहे, परंतु  उद्या संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.

तसेच जिल्ह्यातील सर्व मार्केट कमिटीत दर्शनीय ठिकाणी वाराई हमाली संदर्भात फलक असावे अशी चर्चा मार्केट घटकांमध्ये होत आहे.
close