shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारडीच्या जि.प.शाळेमुळे लोहा तालुक्याची मान उंचावली- मंगल सोनकांबळे


लोहा,(प्रतिनिधी)
लोहा येथून जवळच असलेल्या जि.प.शाळा पारडी येथे दि.११सप्टेंबर रोजी कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, शिक्षकांचा,अखिल म.प्रा.शि.संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला.यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे लोहा  तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे यांनी,पारडी येथील जि.प.शाळेमुळे लोहा तालुक्याची मान उंचावली असल्याचे गौरवौद्गार काढले.

 पंचायत राज समितीकडून विद्यार्थ्यांनी रोख बक्षीस घेऊन, अतिउत्कृष्ट अभिप्राय मिळाला आहे.पारडीच्या जि.प.शाळेमुळे सर्व तालुक्याची मान उंचावली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा,मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी जि.प.नांदेड यांच्याकडून कौतुकाची थाप  मिळवून संपुर्ण तालुक्याची मान उंचावल्या बद्दल अखिल म.प्रा.शि.संघटनेच्या वतीने शाळेत जाऊन केंद्रप्रमुख बाबुराव फसमले, शा.व्य.स. अध्यक्ष विठ्ठल डिकळे, उपक्रमशील मुख्याध्यापक एम.एस.किसवे,डि.पी.बालाघाटे,जी.एल.देशमुख,ज्योती कदम ,चित्रा गंगाखेडकर , इंगोले ,आर.जी.कदम  सर्वांचा पुष्पहार व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल शिक्षक संघटनेचे जि.उपाध्यक्ष शिवराज सोनवळे,मुर्तूज शेख, रमेश पवार,तालुकाध्यक्ष मंगल सोनकांबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश पवार यांनी केले तर,आभार मंगल सोनकांबळे यांनी मानले.
close