इंदापूर येथे मोदी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने बोंबा मारत डिग्री चुलीत घाला आंदोलन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दि.१७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातून काँग्रेसच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने बोंबा मारत डिग्री चुलीत घाला आंदोलन करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत,
इंदापूर तालुका काँग्रेस युवकाध्यक्ष अमोल बंडगर,जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील व चेतन कोरटकर,शहराध्यक्ष चमनभाई बागवान,किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ.संतोष होगले,जिल्हा सरचिटणीस जकिरभाई काझी, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,निवास शेळके,महादेव लोंढे,प्रदीप शिंदे,युवराज गायकवाड,दादा शेंडगे,युनिस पठाण,हर्षल धांडोरे,अनिकेत चंदणशिवे,अनिल कांबळे,विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले मोदी सरकार आपल्या आश्वसनांची पूर्ती करु न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात काँग्रेसने डिग्री चुलीत घाला हे अनोखे आंदोलन केलयं.
युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातही इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालयासमोर शुक्रवार (दि. १७ सप्टेंबर) रोजी इंदापूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने डिग्री चुलीत घाला हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार हाय हाय… भाजपा सरकार हाय हाय…अशी घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर चूल मांडून त्या चुलीमध्ये बेरोजगार युवकांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या छायांकित प्रती जाळून मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

