shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी कायदे रद्द करा ; किसान मोर्चा आक्रमक व तहसिलदाराना निवेदन..!



        प्रमोद चौधरी
        एरंडोल/ जिल्हा प्रतिनिधी
एरंडोल येथे राष्ट्रीय किसान मोर्चा संघटनेतर्फे १६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, केंद्रसरकारने ३ नविन कृषि कायद्याचा आद्यादेश काढला. ते तिन आद्यादेश शेतकरी वर्गाची पिळवणूक करणारे असुन पंजाब हरियाणा येथील शेतकरी संघटनांनी या अध्यादेशाला विरोध करून आंदोलन केले.
पण अजूनही केंद्र सरकार अध्यादेश मागे घेत नाही तरी केंद्र सरकारने सदर अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा.अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नायब तहसीलदार एस.पी.शिरसाट यांना निवेदन देतांना संघटनाचे ता.अध्यक्ष प्रकाश शिंदे , सह सचीव कविराज पाटील, राजेंद्र खैरनार, हेमंत महाजन, आदी शेतकरी उपस्थित होते.

 
close