*निमगावच्या तेजस गायकवाडचे हर्षवर्धन पाटील यांनी केले कौतुक*
इंदापूर प्रतिनिधी
निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड या युवकाने आपल्या घरातील गौरी गणपती समोर देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहीदांच्या आठवणी जागवणारा देखावा सादर केला होता. निमगाव केतकी येथील या देखाव्यास राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन तेजस गायकवाडच्या उत्कृष्ट कलाकृतीच्या सादरीकरणाचे तसेच जनजागृतीचे त्यांनी कौतुक केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमान वाटावा असा देखावा तेजस गायकवाड यांनी आपल्या कलाकृतीतून सादर केला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देत आधुनिक भारताच्या प्रगतीतील महत्त्वाच्या क्षेत्राचा या देखाव्यात सादरीकरण केले आहे.ध्येयाने प्रेरित होऊन देशसेवासाठी तेजसचा प्रयत्न स्तुत्य आहे.'
गायकवाड कुटुंबाने हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करून या देखाव्यास भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

