shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रराज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या शाखा पुणे जिल्हाच्या वतीने दिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनपत्र.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रराज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या शाखा पुणे जिल्हाच्या वतीने दिले    ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनपत्र. 
फोटो - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन.जी.पी. ४५११ पुणे जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देताना.

इंदापूर प्रतिनिधी: (२६ सप्टेंबर २०२१)मार्केट यार्ड पुणे येथील निसर्ग हॉल येथे ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध मागण्याचे निवेदन महाराष्ट्रराज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या शाखा पुणे जिल्हाच्या वतीने(दि.२४ सप्टेंबर) रोजी  देण्यात आले.
 
यावेळी जिल्हा अध्यक्ष जनार्दन मुळे उपाध्यक्ष नामदेव पवार , नथु वरे सचिव शिवाजी बोत्रे, रवींद्र भिसे सदस्य उपस्थित होते.

राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्राम विकास मंत्री, वित्त मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री, ग्रामविकास विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव इत्यादींकडे पंधरा ते वीस बैठका झाल्या असून महा विकास आघाडी सरकार कडून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपल्या शासनाकडून आमच्या मागण्या संदर्भात न्याय मिळेल अशी रास्त अपेक्षा व्यक्त करीत आहोत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे. नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेनी मंजूर करणे. निवृत्ती वेतन लागू करणे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन या कार्यालयात जमा करणे. वेतनासाठी लागलेली वसुलीची अट पूर्णता रद्द करणे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आकृतीबंध सुधारणा करणे. इत्यादी मागण्या असलेले अशयाचे पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना(दि.२४ सप्टेंबर) रोजी देण्यात आले.
close