shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार..!!

पुणे : हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे. याबाबत एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.



सय्यद अली पठाण  (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पठाण याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश शिंदे  (30 रा. अप्पर बिबवेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये हातगाडी लावण्यावरून वाद आहेत. दरम्यान आरोपी आकाश शिंदे याच्या आईन फिर्यादी यांच्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेवरून शिवीगाळ केली.

पठाण याने आकाशला सांगितले की, तुझी आई विनाकारण माझ्या घरच्यांना हातगाडी लावण्याच्या जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करते. तेव्हा तू तिला सांग असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी आकाश शिंदे याने पठाण याच्या गळ्यावर, उजव्या हतावर ब्लेडने वार केले. यामध्ये जखमी झालेल्या पठाण याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

close