गोरे हॉस्पिटलची ओळख आता देशभर..!
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन ) :-
राहाता येथील डॉ. गोरे हॉस्पिटल मध्ये लेझरद्वारे मुळव्याध, फिशर, हर्निया, व्हेरिकोज व्हेन्स (पायांच्या फुगलेल्या नसांचे) विविध पोटांचे विकार, जर्मन टेक्नोलॉजीद्वारे वेदनारहित शस्त्रक्रिया केली जात असून यासाठी रुग्णांना अँडमिट होण्याची गरज नसल्याने डॉ. किरण गोरे यांच्या आधुनिक उपचाराचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्रबरोबर देशातून विविध आजारापासून अनेक वर्षापासून त्रस्त असलेले रुग्ण राहाता येथील डॉ. गोरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत असल्याने गोरे हॉस्पिटलची ओळख संपूर्ण देशात झाली आहे.
त्यामुळे राहाता शहराच्या वैभवात भर पडली आहे. येथील प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे व रेडिओलॉजिस्ट डॉ. अश्विनी गोरे यांच्या माध्यमातून डॉ. गोरे हॉस्पिटल येथे अनेक वर्षापासून विविध आजारापासून त्रस्त असलेल्या रुग्णांवर आधुनिक पद्धतीचा वापर करून उपचार केले जात आहे. त्यामुळे रुग्णांना या आजारापासून दिलासा मिळात आहे. करोना काळात गोरे हॉस्पिटल येथे कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना तात्काळ ऑक्सिजन व बेडची व्यवस्था उपलब्ध करून अनेकांना जीवदान दिले.
डॉ. गोरे यांनी आठवड्यातून एक दिवस श्री साईबाबा संस्थान सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल येथे जाऊन कोविड रुग्णांना मोफत सेवा दिली. तसेच वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हजारो रुग्णांचे यशस्वी मूळव्याध शस्त्रक्रिया करण्यात ते संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.
अनेक वर्षापासून मुळव्याध, फिशर हर्निया, पोटांचे विकार, व्हेरिकोज व्हेन्स यासारख्या आजारापासून त्रस्त असलेल्या रुग्णांवर लेझर टेक्नॉलॉजीद्वारे वेदनारहित यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. राज्यासह देशातून आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण गोरे हॉस्पिटल येथे येत असल्यामुळे मोठे समाधान वाटते.
- डॉ. किरण गोरे, मुळव्याध तज्ञ

