shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संघटनेने कोणाचेही मांडलिकत्व आणि लाचारी पत्करू नये. - दत्तात्रय कडू पाटील..!


देवळाली प्रवरा - विश्वकर्मा बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा देवळाली प्रवरा येथे भव्य कामगार मेळावा संपन्न झाला, त्या प्रसंगी बोलताना दत्तात्रय कडू पाटील म्हणाले की, संघटनेने कोणाचेही मांडलिकत्व आणि लाचारी पत्करू नये. 




माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजित पाटील कदम,  सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढुस,  आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात,  देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगरसेवक सचिन ढुस,  व्यापारी संघटनेचे देवळाली शहराध्यक्ष सतीश वाळुंज, कॉम्रेड नेत्या मदिना शेख,  श्रमिक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद भाऊ संसारे,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण,  सचिन कोठुळे,  देवळाली प्रवराचे इंजिनिअर मनोज शिंदे, अनिस शेख, संकेत चव्हाण, संगणक तज्ञ  इमरान शेख आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी पुढे बोलताना दत्तात्रय कडू पाटील म्हणाले की, कष्टक-याला व कामगाराला त्याचे हक्काची जाणीव करुन देत त्याला सन्मानाने जगता यावे म्हणुन ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे.  इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळच्या माध्यामातुन तळागाळाच्या शेवटच्या घटकांपर्यत योजना नेण्याची गरज असून कामगारानी आपले हक्क मिळवताना कोणाच्या दावणीला बांधल्या जाऊ नये, राजकारण विरहित आपला उत्कर्ष साधावा, संघटनेने कोणाचेही मांडलिकत्व आणि लाचारी पत्करू नये.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, उपाध्यक्ष पांडुरंग परदेशी, सचिव संदीप गाडेकर, संघटक अब्दुल शेख, सह सचिव भिमराज डुकरे, सदस्य सचिन लेंभे, अक्षय कोळसे, दीपक संसारे, विजया घुले, मोहन भोळे, शिवाजी सांबारे, जालिंदर दुशिंग, दिलीप उंडे आदी सर्व कार्यकारणी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. 

या मेळाव्यात नोंदणीकृत कामगारांना शासनाचे ओळखपत्र आणि बांधकाम करताना वापरावयाचे सुरक्षा साधनांचे किट वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या अडी अडचणी बाबत व शासनाच्या विविध योजना त्यांना मिळवून देण्यासाठी विविध विषयावर चर्चा विनिमय झाली. या मेळाव्यास मोठ्या संख्येने बांधकाम कामगार व इतर कामगार हजर होते. 

या प्रसंगी दत्तात्रय कडू पाटील यांचे सह बाळासाहेब चव्हाण, अजित पाटील कदम , आप्पासाहेब ढुस, सुरेंद्र थोरात,  मदिना शेख, शरद संसारे, सत्यजित कदम, सचिन ढुस आदी मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन बाळासाहेब कराळे यांनी केले.
close