शिर्डी | दि. ६ प्रतिनिधी :
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजयजी महाजन यांची भाजप ओबीसी मोर्चा राहाता तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब काटकर, राहता तालुका अध्यक्ष रमेश बनकर, उपतालुका अध्यक्ष दीपक काटकर, शिर्डी शहर अध्यक्ष वैभव सोनवणे, प्रवीण बनकर, उमेश काटकर, शुभम खरात, किरण दिघे, रवींद्र काटकर, अक्षय काटकर तथा अन्य मान्यवर, मित्र परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी अनेक मान्यवर मित्र परिवार आदी उपस्थित होते.


