shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी विवेकानंदांन चौकात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष...!


प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई : सोनई येथील स्वामी विवेकानंद चौकांत सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असुन रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून पावसाळ्यात येथे ठिक ठिकाणी खड्डे पडले असून वाहन चालवताना अनेक जण घसरुन पडले आहेत.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येथील गटाराचे श्रीफळ फोडुन पुजन करुन गांधीगिरी करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही ग्रामपंचायत पदाधिकारी यांना काहीच फरक पडलेला नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने पायीं चालणे सुध्दा मुशिकिल झाले आहे.


सोनई गावातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक पुर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गावातील सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मात्र याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र मंत्र्यांच्या गावातील रस्त्याची ही अवस्था तर इतर ठिकाणच्या बाबतीत विचार न केलेला बरा..!

विवेकानंद चौकांतुन इतर गावांना जोडणारे रस्ते असल्याने येथे कायमच वर्दळ असते. त्यामुळे येथे कायमच अपघात होत असतात काम मंजुर झाले तरी काम सूरु करण्यासाठी मुहूर्त मिळेना का? अशी म्हणण्याची वेळ येथील व्यावसायिका वर आली आहे. ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी येथे पावसाळया पुर्वी मुरुम टाकतात. मात्र पक्का रस्ता काही केल्या होईना? कायम पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. मंत्री महोदयांना लक्ष देण्यास वेळ मिळेल का ? येथील व्यवसाईकात प्रचंड नाराजी असून ग्रामपंचायती बद्दल तीव्र नाराजीचा सूर जनतेतून दिसत दिसतो आहे.
close