श्रीरामपूर । प्रतिनिधी :
राज्य सरकारने दर्शनासाठी मंदिरे त्वरीत खुले करावे यासाठी मनसेच्या वतीने श्रीरामपूर येथे श्री हनुमान मंदिरा समोर बाबा शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर दर्शनासाठी मंदिर व इतर सर्व धार्मिक स्थळे खुले करावे यासाठी मनसेच्या वतीने श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन समोरील श्री हनुमान मंदिरा समोर मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून व मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले
त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य काम केले हिंदुत्ववादी चळवळ सातत्याने जिवंत ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने पक्षाची स्थापना केली व छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य अबाधित राहावे या साठी सातत्याने काम केले त्यांचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असताना हिंदूंचे श्रद्धास्थान असणारे मंदिर उघडण्यासाठी हिंदूंवर आंदोलन करण्याची वेळ त्यांनी आणली आहे.
ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल मॉल बियर बार असे गर्दीचे ठिकाण चालू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले तसेच सत्ताधारी पक्षांचे व विरोधी पक्षांचे विविध स्वरूपाचे कार्यक्रम मेळावे मोठ्या प्रमाणात गर्दी करून होत आहेत व कुठलेही प्रकारे कोरोना चे नियम पाळले जात नाही यांच्या गर्दीच्या कार्यक्रमाने कोरोना चा प्रादृभाव वाढत नाही का? हिंदूंचे मंदिर उघडल्यानेच किंवा हिंदूंचे सण साजरा झाल्यानेच कोरोनाचा प्रादृभाव वाढतो का? सर्व नियम अटी हिंदूंनाच का? यातून एकच सिद्ध होते की हे सरकार हिंदू विरोधी आहे .
कुंभकर्णा सारखे झोपी गेलेल्या मुख्यमंत्री व त्यांच्या सरकारला जागे करण्यासाठी आजचे हे घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे जर या आंदोलनाची दखल घेऊन येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची परवानगी न दिल्यास सर्व हिंदू बांधवांना घेऊन या सरकारच्या विरोधात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल व या सरकारला त्याचा गंभीर परिणाम भोगावे लागेल याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे,तसेच मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे म्हणाले की श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये व तसेच संपूर्ण राज्यामध्ये गल्ली बोळापासून ते बाजारपेठेमध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करून फिरत असतात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नाही व यामुळे कोरोनाचा पादुर्भाव वाढत नाही का?
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष वाले हे पूर्वीपासूनच हिंदू विरोधी आहेत परंतु कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष समजला जाणारा शिवसेना पक्ष सुद्धा त्यांच्यात जाऊन सोनिया पवार सेना होवुन काम करेल असे वाटले नव्हते म्हणून या निष्क्रिय व हिंदू विरोधी राज्य सरकारचा जाहीर निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेना करीत आहे
असे तुषार बोबडे जिल्हा सचिव म्हणाले या घंटानाद आंदोलन प्रसंगी श्रीरामपूर येथील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमुन मंदिरासमोर घंटा वाजवून जोरजोरात घोषणा देऊन या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय धिक्कार असो
धिक्कार असो हिंदूविरोधी सरकारचा धिक्कार असो
उद्धवा अजब तुझे सरकार दारूचे दुकान दुकाने चालू व मंदिरे बंदनही चाहिये नही चाहिये बिन कामी सरकार नही चाहिये मुर्दाबाद मुर्दाबाद उद्धव सरकार मुर्दाबाद अशा विविध स्वरूपाची घोषणा देऊन रेल्वे स्टेशन परिसर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणांनी व घंटांच्या आवाजाने दणाणून सोडला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी
जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप,
शहराध्यक्ष गणेश दिवसे, कामगार सेना उपचिटणीस नंदू गंगावणे, सहकार सेना तालुका अध्यक्ष उदय उदावंत,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल दातीर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, मनसे तालुका संघटक भास्कर सरोदे शहर संघटक निलेश सोनवणे तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ येडे तालुका सचिव शिवनाथ फोपसे तालुका चिटणीस विष्णू अमोलिक तालुका उपाध्यक्ष करण कापसे शहर सचिव ईश्वर जगताप शहर चिटणीस अमोल साबणे शहर उपाध्यक्ष प्रसाद शिंदे निलेश लांबोळे संदीप विशंभर बाबासाहेब भालेराव राजू शिंदे विभाग अध्यक्ष संतोष आवटी विद्यार्थी सेना तालुका संघटक अतुल तारडे विद्यार्थी सेना तालुका सरचिटणीस सोमनाथ कासार विद्यार्थी सेना शहर सरचिटणीस संकेत शेलार विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष रतन वर्मा मनोज शिंदे सुरेश शिंदे लक्ष्मण जोगी विकी शिंदे शुभम शिंदे नितीन खरे लखन शिंदे राजू पोटरे राहुल शिंदे चैतन्य थोरात किसन खामकर अमोल महेश गणेश खेमनर दत्तु साबळे पवार किशोर थोरात शुभम पुंड मनोज चव्हाण गणेश गायतोंडे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

