shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रांजणगाव एमआयडीसी मधील सिक्युरिटी गार्ड चे अपहरण व खून करून फरार असलेले आरोपी जेरबंद..!


पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई..!

रांजणगाव । प्रतिनिधी :-
मागील वर्षी पाचंगे इंडस्ट्रीज रांजणगाव एमआयडीसी मधील सिक्युरिटी गार्ड चे अपहरण करून खून केल्या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २१२/२०२० भादवि कलम ३६३,३६४,३६५,३०२ ,१२०(ब) नुसार गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी १) निलेश मच्छिन्द्र गव्हाणे वय २१ व २) रोहित संपत शेलार वय २१ हे दोघे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

दि २१ सप्टेंबर २०२१ रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह न्हावरे परिसरामध्ये असताना सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना वरील आरोपी हे न्हावरे फाटा शिरूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून पथकाने सापळा रचून वरील आरोपींना न्हावरे फाटा शिरूर येथून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला सुपूर्त केले आहे.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख ,लक्ष्मण राऊत या पथकाने केली.
close