श्रीरामपूर (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध वृत्त वाहिनी एबीपी माझ्याच्या वृत्त निवेदिका (News Anchor) व सुप्रसिद्ध पत्रकार नम्रता वागळे यांच्या 'विनम्रतासे - शब्द सरिता' या उपक्रमा साठी संपूर्ण महाराष्ट्रातून 'निसर्ग' या विषयावर कविता मागविण्यात आल्या होत्या. त्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशातील इतर भागातील मराठी भाषिक कवींनी आपल्या कविता पाठविल्या होत्या.
त्यातून दहा उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात आली होती. त्या दहा कवितांमधून सर्वोत्कृष्ट कविता क्रमांक चार म्हणून प्रा. अक्षय तेलोरे यांची 'धरा' हि कविता निवडण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या दहा कवितांपैकी सात कवितेचे सादरीकरण स्वतः नम्रता वागळे यांनी केले होते, त्या मध्ये प्रा. तेलोरे यांच्या कवितेचा देखील समावेश होता. सध्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले तेलोरे सर यांचे अनेक लेख, कविता व वात्रटिका दै. युवा ध्येय तसेच इतर वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कवितेची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


