प्रतिनिधी : रफिक शेख
पारनेर:- (दि १ ) : श्री समर्थ ॲकॅडमी संचलित श्री समर्थ पॉलिटेक्निक म्हसनेफाटा तालुका पारनेर या महाविद्यालयाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या उन्हाळी परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे .महाविद्यालयातील उन्हाळी 2021 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे . कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शाखेमध्ये तृतीय वर्षामध्ये कुमारी जोशी श्रेया प्रवीण या विद्यार्थिनीने 87.41 %मार्क मिळून महाविद्यालय मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमधील तरटे प्रतिक विठ्ठल या विद्यार्थ्याने 91.35% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग तृतीय वर्ष शेख अजहर अन्वर 85.74% प्रथम क्रमांक मिळविला आहे . तसेच महाविद्यालय मधील द्वितीय वर्षांमधील कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या विभागांमध्ये भुजबळ श्रुती मिलिंद या विद्यार्थिनीने 87.2% तसेच प्रथम वर्ष कंप्यूटर इंजीनियरिंग मधील पवार ऋतुजा संतोष तिने 87. 25% गुण मिळवून कॉम्प्युटर विभागांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागातील द्वितीय वर्षांमधील अनारसे पवन गणेश या विद्यार्थ्याने 80.90% मिळवून व प्रथम वर्षातील बनकर प्रफुल्ल बाप्पू या विद्यार्थ्याने 79.50% गुण मिळविले आहेत . द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागांमध्ये राईसोनी संहिता दीपक या विद्यार्थिनीने 83.25% व प्रथम वर्ष सिव्हिल मधील गटणे शुभम कर चंद्रशेखर या विद्यार्थ्याने 78.95 %गुण मिळविले आहेत .
तृतीय वर्ष मेकॅनिकल मधील दळवी दर्शन सुधीर 85.55 % द्वितीय वर्ष मेकॅनिकल मधील कुलकर्णी विजय पद्माकर 84.24% व प्रथम वर्ष मेकॅनिकल मधील वाघमारे संजय कुमार जगन्नाथ 76.5 %गुण मिळविले आहेत .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक श्री . कैलास गाडीलकर व प्राचार्य भाऊसाहेब अनारसे व सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे .
तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना साठी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत•

