shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर येथील मयत सुनील गायकवाड च्या पिडीत कुटूंबाला वडार समाज संघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र मंजूळे यांनी दिली भेट..!


बेलापूर येथील गुप्तधन प्रकरण ..!

बेलापूर :- बेलापूर येथील गुप्तधन खोदाई मजूर कामगार सुनील गायकवाड  याने आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी,भाऊ,चार लहान लहान मुली असा परिवार‌ आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वडार समाज संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र मंजूळे यांनी तातडीने गायकवाड कुटुंबीयांना भेट दिली.  

यावेळी वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव तथा" शिर्डी एक्सप्रेस "चे संपादक रमेश जेठे सर, वडार समाज संघाचे , जिल्हा अध्यक्ष संपतराव गायकवाड, काॅग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नाना मांजरे,मी वडार महाराष्ट्र संघटनेचे  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धनवटे, वडार समाज संघाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष नवनाथ धनवटे, बाबासाहेब कुसकर यांनी भेट देऊन सदर कुटूंबाला योग्य न्याय मिळण्यासाठी सर्व पातळ्यांवर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सविस्तर माहिती अशी की, वडार समाजाचा सुनील गायकवाड हा बेलापूर येथील सधन व्यक्तिच्या घर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी दोन जणांसह खोदकाम करीत होता. त्यावेळीं तेथील खोदकामात गुप्तधन म्हणजे चांदीची व सोन्याचे नाणी असलेला तांब्याचा हंडा सापडला. त्यावेळी सुनील गायकवाड याने मालकाला सांगितले. व मालकाने सांगितल्याप्रमाणे तो हंडा विनासायास चार लोकांना न उचलणारा हंडा बाहेर काढून देऊन मालकाच्या हवाली केले. 


त्यावेळी  चांदी- सोन्याचे नाण्यांनी भरलेला तांब्याचा हंडा सुमारे ५०-६० किलोचा सापडल्याचे बोलले जाते.त्यातील फक्त २० टक्के या प्रकरणचा थोडा गाजावाजा झाल्यावर सरकार जमा करून बाकी नाणे संबंधित मालकाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ८० टक्के माल हडप केल्याचे बोलले जाते. 

यावेळी आपल्या समाजाच्या सुनील गायकवाड याला कोणाला सांगू नको नाहीतर तुझे जिणे मश्किल करू  अशा दमदाटी मुळे व संबंधित लोकांनी त्यांचे शारीरिक व मानसिक त्रास केल्या मुळे  सुनील गायकवाड याने आत्महत्या केली आहे, असे समजते. त्याला लहान लहान चार मुली आहेत , त्यांचे प्रपंच उघड्यावर आले आहे. 

सुनील गायकवाड चे पिडीत कुटुंब अतिशय प्रामाणिक व गरिब आहे. त्यांना सर्वांनीच सढळ हाताने सर्वतोपरी मदत करणेसाठी वडार समाजाने आवाहन केलेआहे.
close