shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आर्ट बिटस् फौऊंडेशन पुणे यांच्याकडुन " युवा कला गौरव पुरस्कार 2021" साठी पुण्यातील नामवंत फिल्म मेकअप आर्टिष्ट - सुजित सुरवसे यांची निवड...!

पुणे । प्रतिनिधी :- 
आपल्या जादुई हाताने वेगवेगळ्या चेहर्‍यांवर रंगछटा रंगवणारे .पुण्यातील युवा चिञपट रंगभुषाकार सुजित सुरवसे यांच्याशी केलेली .बातचीत कॅमेर्‍याची मागणी म्हणुन नायिकांना रंगरंगोटी करावीच लागते .सिनेमाच्या क्षेञात मेकअप महत्वाचा असला तरी तो करणार्‍यांना फारसं महत्व नव्हतं पण आपल्या वैशिष्ट्यापुर्ण कामातुन मेकअप डिझायनपर्यंतचा प्रवास करणार्‍या सुजित सुरवसे यांनी या क्षेञाची सगळी गणितंच बदलुन टाकली आहेत .मेकअपच्या माध्यमातुन होणारा परकाया प्रवेश, या क्षेञातला त्यांचा प्रवास .या क्षेञाचे विविध पैलु याविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा..!

    
पुण्यातील 25 वर्षांचा सुजित सुरवसे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झालेले.घरची परीस्थिती हलाखीची होती.म्हणुन 2009 साली घर सोडले. आणी थेट मुंबई गाठली,कामाच्या शोधात मिळेल ते काम करुन 1 वर्ष घालविले,नंतर काही मिञांच्या मदतीने फिल्म इंडस्र्टीमध्ये दाखल झाला.त्यात स्पाॅट बाॅय पासुन मेकअपमनचा असिस्टंट म्हणुन काम करुन दिवस ढकलु लागला.घर सोडताना कष्ट करायची जिद्द बाळगुनच त्याने मुंबई गाठली होती.काम करत गेला आणी नवनविन गोष्टी शिकत गेला.आणी आज एक उत्तम दर्जाचा Film Makeup Artist  म्हणुन Film industry मध्ये  नावारुपास आला. सुजित चा घर सोडल्या पासुन ते Film industry मधील आजपर्यंतचा प्रवास खुप संघर्ष आहे. जिवन जगताना अनेक सुपरहिट मराठी,हिंदी,तेलुगु,भोजपुरी,गढवाली, अशा अनेक चिञपट मालिका लघुपटांमध्ये Makeup Artist म्हणुन सुजित ने काम केले आहे.


आपल्या समोर येणारे अनेक सुंदर चेहरे आपल्याला कायम लक्षात राहतात.पण त्यामागे प्रचंड मेहनत असते ती रंंगभुषा कलेची पडद्यामागे दिसणार्‍या दार्शनिकदृष्ट्या अविश्वसनिय कायापालट करण्याचा कला पध्दती आणी आधुनिक तंञ त्यांचा परदेशी जावुन शिकण्याचा मानस आहे. तसेच आत्ताच त्याने रंगभुषा म्हणुन काम केलेल्या 2019 मधील (LL  LLORONA ) या फिल्म ला USA मध्ये Thing's2 Fear Festival 2019 मध्ये Best Makeup Artist म्हणुन सुजित ला सन्मानित केले. तसेच 'अखिल भारतीय वडार साहित्या संमेलन 2019' मध्ये पण सुजित ला Best Makeup Artist म्हणुन  ( समाजगौरव ) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सध्या सुजित विविध चिञपटांमध्ये रंगभुषाकार म्हणुन काम करत आहे. अनेक मोठ्या कलाकारांसोबत सुजितने Makeup Artist म्हणुन काम केले आहे.मराठी आणी हिंदी मधील दिग्गज नायक - नायिकांना आपल्या खुबीने रंगवले आहे.खुपच शांत आणि सरळ स्वभावाचा सुजित जेव्हा त्याचं अंतरंग उघडतो आणी काही गोष्टी सांगतो तेव्हा स्पष्ट दिसुन येते. त्याच्या मनाची आणि विचारांची प्रगल्भता मेकपवाली माणसं मध्ये सुजित सुध्दा त्याचं अस्तीत्व दाखवत राहणार....!


close