shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडगाव मावळ न्यायालयाने संजय भेगडे केस दाखल करण्यास झालेला डिले केला मंजूर ; संजय भेगडे खोटे प्रतिज्ञापत्र प्रकरणाची मावळ कोर्टाने घेतली दखल


प्रतिनिधी : संजय वायकर

 वडगाव मावळ : १०  /    पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल भागाजी भांगरे व डॉ . अभिषेक हरिदास यांनी वडगाव मावळ  कोर्टात संजय भेगडे  यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती . मेहेरबान न्यायालयाने सदर प्रकरण दाखल करून या दाखल Cri. M.A ५६६/२०२१ प्रकरणावर माननीय न्यायालयाने दखल घेऊन सिआरपीसी २०० प्रमाणे न्यायालयाने फिर्यादीने स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे  . तसेच दिनांक ०४/१०/२०२१ रोजी या प्रकरणात मेहेरबान न्यायालयाचे  केस दाखल करण्यास झालेला डिले मंजूर केला असून पुढील सुनावणी २३/१०/२०२१ रोजी ठेवली असल्याची माहिती  डॉ . अभिषेक हरिदास यांनी दिली.

    माजी राज्य मंत्री संजय भेगडे  यांनी त्यांच्या २०१४ व २०१९ च्या  निवडणूक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळे माहिती दिल्या होत्या तसेच अनेक गोष्टी लपवल्या होत्या .एवढेच काय तर त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खरेदी केलेल्या  मालमत्ता यांच्यात तफावत आहे. तसेच संजय भेगडे यांनी प्रतिज्ञापत्रात अनेक गुन्ह्याचे खटला क्रमांक लपवला आहे तसेच लोणावळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात  दाखल झालेला गुन्हा  देखील लपवला होता .  

सदर प्रकरण गंभीर असून या बाबत मेहेरबान न्यायालय नक्कीच योग्य तो न्याय करेल अशी अपेक्षा असल्याचे आयु.डॉ . अभिषेक हरिदास यांनी सांगितले .

 लोकशाही बळकट होण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असून नागरिकांनीही यात आमची साथ दिली पाहिजे असे आयु . अनिल भांगरे यांनी सांगितले .

जनते साठी आणि लोकशाही टिकवण्या साठी आम्ही खोटे प्रतिज्ञापत्र बाबत कोर्टाचे  यापुढेही केसेस दाखल  करणार असल्याचे यातील  प्रमुख साक्षिदार सुनील पवार यांनी सांगितले .
close