shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष, क्रांतीसेनेचे निवेदन..!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
राहुरी : महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे आदींसह संबंधित विभागाच्या सचिवांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. 
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध करत दि.११आक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद केला. याबाबत सरकारचे शेतकरी या नात्याने आभार व्यक्त केले आहे. यातुन आपले सरकार हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, हे सिद्ध झाले आहे. परंतु अखिल भारतीय क्रांतीसेनेनेच्या माध्यमातून गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी शासकीय स्तरावर मोजणी करण्यासाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दुध दर वाढीसाठी, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याबाबत, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत, राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी, राहुरी तालुक्यातील कांदा बियाणे फसवणूक प्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळुन संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागण्या केल्या आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close