shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालकथित प्रेमानंद रूपवते यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.!



 संगमनेर । प्रतिनिधी:-  २५ ऑक्टोबर हा कालकथित प्रेमानंद रूपवते यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त प्रेम-स्नेह परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी सकाळी ११ वाजता भंडारदरा येथे धम्म वंदना व अभिवादन सभा, स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी ३ वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मा.रा.लामखडे (सर) यांच्या 'तथागताच्या वाटेने 'या पुस्तकाचे प्रकाशन सायंकाळी ५.३० वाजता 'स्नेहांजली' या कार्यक्रमांमध्ये संपन्न होणार आहे. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे असणार असून पुस्तकाचे प्रकाशन दैनिक लोकमतचे अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र  राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष अर्जुनराव कोकाटे आणि बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त संघराज रूपवते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना कालकथित प्रेमानंद रुपवते (बाबुजीं)नी अनेक माणसे जोडली .'स्नेहांजली 'या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाबूजींच्या आठवणींना उजळा देण्याचा प्रयत्न असेल .या कार्यक्रमांसाठी  आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्रेम -स्नेह परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
close