अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचा इशारा-जिल्हाध्यक्ष डी.बी.भुजबळ
नगर । प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिनांक १३.१०.२०२१ पासून सर्व कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलेले होते तथापि मा.ना.श्री. बाळासाहेब थोरात साहेब, मंत्री, महसूल व मा.डॉ.श्री.नितीन करीर साहेब, अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई -३२ यांचे समवेत झालेल्या चर्चेनुसार व महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची कार्यकारणीची दिनांक २४.१०.२०२१ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार दिनांक १३.१०.२०२१ पासून सुरु झालेले आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे.
तथापि संदर्भीय दिनांकास झालेल्या चर्चेनुसार श्री. जगताप यांची बदली १५ दिवसात करणेत यावी.अन्यथा स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येणार आहे, असे अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष डी.बी.भुजबळ यांनी सांगितले.

