शिक्षक समितीच्यावतीने आरोग्य विभागातील सर्व डाॕक्टर , आरोग्य सेविका , कर्मचारी यांचा सत्कार..!
कोविड लसिकरणचे १०० कोटी डोस टप्पा पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता सन्मान संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:(दि.२१ ऑक्टोबर २०२१)महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारे , कोविड १९ काळात अविरतपणे सेवा करणारे , कोविड १९ लसीकरणाचे १०० कोटी मात्रा पूर्ण केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव , पळसदेव , निमगाव केतकी, भिगवण येथील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेविका , सुपरवाजर , सहाय्यक , सफाई कर्मचारी , शिपाई , रूग्णवाहिका चालक सर्वाचा सत्कार करण्यात आला.
कोविड १९ विरोधात लस प्रभावी असून तालुक्यातील सर्व भागात लसीकरण करण्यात आरोग्य विभागाचा फार मोठा वाटा असून लवकरच तालुक्यात १०० % लसीकरण पूर्ण होईल.असा विश्वास सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केला.
गुरूजी मुळे मी डाॕक्टर झालो - डाॕ अरविंद अरकिले.
निमगाव केतकी येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारे डाॕ अरकिले यांनी सत्कार प्रसंगी त्यांच्या आयुष्यात कलाटी देणारा प्रसंगी सांगितला.ते म्हणाले इयत्ता ४ थी असताना परिस्थितीमुळे शाळा सोडवी लागणार होती.परंतु गुरूजींनी माझे ७ वी पर्यतचे शिक्षण स्वखर्चातून केले. अगदी स्वतःच्या घरी राहण्याची व जेवणाची सोय केली.त्यांचे सहकार्य माझ्यासाठी अनमोल आहे.सर्व गुरूजींनी माझा व स्टाफचा सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
शिक्षक समितीच्या वतीने कुंभारगाव येथे शिक्षक सोसायटी माजी चेअरमन सुनिल वाघ , संतोष साबळे , यादवराव सोनवणे , संतोष वणवे , पळसदेव येथे , माजी शिक्षक सोसायटी माजी चेअरमन सुनिल शिंदे , मोहन लोंढे , रमेश शेलार , सचिन अभंग , भगत सर , राहुल कानगुडे , संजय जाधव , हरिश्चंद्र पवार , व निमगाव केतकी येथे केंद्र प्रमुख संभाजी आजबे , शिक्षक सोसा माजी चेअरमन किरण म्हेञे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , अतुल जौंजाळ , अजिनाथ आदलिंग , राजकुमार राजगुरू , नंदकुमार सूर्यवंशी , संतोष चोरमले , सतिष भोंग , चंद्रकांत रामाणे , बापूराव जाधव , महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग , प्रतिभा जौंजाळ , जुनी पेन्शन तालुका अध्यक्ष संतोष हेगडे आणि भिगवण येथे शिक्षक सोसायटी मा.चेअरमन सुनिल वाघ, मा.तज्ञ संचालक प्रमोदकुमार कुदळे , जिल्हा प्रतिनिधी भारत गायकवाड , प्रकाश वाघ , सुरेश माने , तानाजी सुतार त्याचप्रमाणे उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन सुनिल शिंदे , तालुका उपाध्यक्ष नजीरभाई शिकीलकर , सरचिटणीस विनय मखरे व शिक्षक नेते नागेश जाधव यांचे उपस्थित होते.

