इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे गाय गोट्याची ३३ प्रकरणे मंजूर - लोंढे .एम. एबी.
गुलाबपुष्प व आदेशाची प्रत देऊन लाभार्थ्यांचा सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी:पंचायत समिती इंदापूर अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे गाय गोट्याची ३३ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
सदर प्रकरणे मंजूर करण्यासाठी इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या सहकार्याने, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या प्रयत्नाने व इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चे सचिव लोंढे एम एबी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३३ गाय गोठ्याची प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती एम एबी लोंढे यांनी दिली.
सदर गाय गोठा मंजुर प्रकरणाच्या आदेशाचे वाटप काँग्रेस कमिटी चे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत, शहर अध्यक्ष चमणभाई बागवान,यांचे हस्ते गुलाबपुष्प व आदेशाची प्रत देऊन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस जकिरभाई काझी, इंदापूर तालुका काँग्रेस चे सरचिटणीस निवास शेळके , इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल बंडगर, सचिव लोंढे एम बी, काँगेस चे सक्रिय कार्यकर्ते अंकुशराव भोसले आणि इत्यादी उपास्थित होते.
तसेच लाभार्थी यादीतील विजय वाघमोडे, बबन वाघमोडे (खोरोची),आबा वाघमोडे, सिद्धार्थ साळवे (कालठण नं१),प्रवीण कांबळे, दत्तू चव्हाण (बिजवडी),रतीलाल लोंढे, बापू गोपीनाथ लोंढे (गागरगाव), संतोष पवार (पोंदकुलवडी),सिकंदर पठाण (राजवडी),भानुदास गायकवाड (वनगळी) सह इतर लाभार्थी उपस्थित होते.

