राष्ट्रीय महामार्ग ९६५ सुरवड ते सराटी रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती बाबतचे अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने इंदापूर तहसीलदारांना निवेदन सादर.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ सुरवड ते सराटी महामार्गावरील खड्डे दुरुस्ती बाबत उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सोलापूर यांच्या नावे निवेदन पत्र इंदापूर तहसील कचेरी येथे नायब तहसीलदार डी. एस.लवांडे यांना भारतीय मराठा सेवा संघ यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे, भाजप युवा मोर्चा इंदापूर तालुका सरचिटणीस सचिन सावंत हे उपस्थित होते.
पवन राजे घोगरे यांनी दिलेल्या निवेदनात सुचित करण्यात आले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ सुरवड ते सराटी या रस्त्यावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून दि. ६ ऑक्टोबर रोजी बावडा शहाजीबाग जवळ अपघात होऊन अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले. असून आता शाळा महाविद्यालय चालू झाले आहेत .लवकरच साखर कारखाने देखील चालू होणार आहेत .या रस्त्यावर ती मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. तरी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त व्हावे तसेच मार्गावरील गतिरोधकास पांढरी पट्टी किंवा एलईडी लॅम्प बसवलेले नाही त्यामुळे गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. या मागण्यांचा विचार आठ दिवसात करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन दिनांक ८ऑक्टोबर २०२१ रोजी तहसील कचेरी इंदापूर येथे देण्यात आले.

