shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी च्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले निवेदन .भटके-विमुक्त जाती-जमातीच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा अशी मागणी असणारे निवेदन इंदापूर तहसीलदार यांना देण्यात आले.

भारतीय जनता पार्टी च्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने  इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले निवेदन .

भटके-विमुक्त जाती-जमातीच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल  मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा अशी मागणी असणारे निवेदन इंदापूर तहसीलदार यांना देण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधी:भाजपाच्या इंदापूर तालूका भटके विमुक्त जातीजमाती (VJ/NT) च्या कर्मचाऱ्याच्या / अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल  मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन हे आरक्षण पूर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने  इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन . (दि.११) रोजी देण्यात आले.

    सदर निवेदनात    दि २९/०९२०२१ रोजी आपल्या शासनाच्या वतीने सरकारी वकील   नितीन पाटील यांनी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणा बद्दल मा सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात भटक्या विमुक्त जातीजमातींना आरक्षण  देने असंविधानिक आहे ,असे म्हटले आहे, ही बाब भटक्या समाजासाठी अत्यंत अन्यायकारक व घातक आहे, यामुळे केवळ सरकारी कर्मचारी/ अधिकारीच नव्हे तर संपूर्ण भटक्या विमुक्त  समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

भटक्या विमुक्त मधील बहुतेक जातींची अनुसूचित जाती जमाती मध्ये समावेश व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे .अनुसूचित जाती जमाती प्रमाणेच भटक्या विमुक्ताना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीतआरक्षण, राजकीय आरक्षण,शैक्षणिक आरक्षण  तसेच पोटासाठी भटकंती करणाऱ्या या समाजासाठी अ‌ॅक्ट्रोसिटी कायदा लागू करणे  व अर्थसंकल्पात लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे  या सर्व मागण्या अनेक वर्षांपासून हा समाज करत  असताना त्यावर  आपण कोणतीही कार्यवाही न करता सध्या मिळत असलेले तुटपुंजे आरक्षणही आपल्या नेतृत्वाखाली, आघाडी सरकारचे तथाकथित शिल्पकार व मार्गदर्शक , सतत शाहू, फुले आंबेडकरांच्या नावाचा  घोष  करणारे खा. शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आघाडी सरकारचा  डाव दिसून येत आहे. हा डाव संपूर्ण समाजाच्या लक्षात आला आहे. राज्यात सुमारे २०% असलेला हा भटका समाज आपल्या पक्षासह सरकारमध्ये सहभागी असलेल्या इतर दोन राजकीय पक्षाला मोठा धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही .
तरी आपण या विषयाचे गांभीर्य ओळखून   मा न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन भटक्यांचे आरक्षण पुर्ववत चालू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करावे
  
अन्यथा याविरोधात भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल , या आंदोलनाच्या परिणामास शासन जबाबदार असेल
   तरी आपण वरील विषयी तात्काळ कार्यवाही करून भटक्या समाजावरील अन्याय दूर करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.



यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी तरंगे, स्वच्छ भारत अभियान चे महेंद्र रेडके,युवा मोर्चा लोकसभा बारामती प्रमुख तेजस देवकाते,रणजित पाटील,माऊली मारकड,सहदेव सरगर,पांडुरंग सुळ, हाणूमंत निंबाळकर,गणेश नरूटे,रमेश खारतोडे शिवाजी देवकाते आदींनी निवेदनावर स्वाक्षरी केली असून भटके विमुक्त कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देत तिव्र निषेध नोंदवला आहे.
close