*हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जुबेन पठाणचा सत्कार*
इंदापूर प्रतिनिधी-(६ ऑक्टोबर २०२१)
महात्मा फुले विद्यालय, वरकुटे खुर्द येथील विद्यार्थी चि.जुबेन इम्रान पठाण याने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला तसेच त्याचे अभिनंदन करीत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की जुबेन पठाण याने आपल्या प्रशालेचे, कुटुंबाचे नाव उज्वल केले असून प्रामाणिक प्रयत्न केले असता यश संपादन करता येते असे यावेळी त्यांनी सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
महात्मा फुले विद्यालय, वरकुटे खुर्दचे अध्यक्ष ॲड. कृष्णाजी यादव, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

