रेड क्रॉस सोसायटी उपक्रम..!
श्रीरामपूर - के .के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने व भामाठान ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव सुनील साळवे यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामाठान येथे रुग्ण तपासणी सर्व कोरोनाचे नियम पाळून होईल. प्रथम शुगर व बी.पी.तपासणी होईल त्यानंतर मोतीबिंदू तपासणीमध्ये मोतीबिंदू असल्यास पुणे येथे बुधरानी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया होतील. पुणे येथे जाणे येणे तेथे निवास भोजन सर्व व्यवस्था मोफत केलेली आहे.
रुग्णांनी येताना आधार कार्ड अथवा मतदान कार्ड सोबत आणावे नावनोंदणी ग्रामपंचायत भामाठाण येथे करावी
सदरच्या शिबिराचा लाभ भामाठाण,भोकार,कमलपुर, खानापूर, टाकळीभान,पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रेड क्रॉस चेअरमन तथा प्रांताधिकारी अनिल पवार,व्हाइस चेअरमन तथा तहसीलदार प्रशांत पाटील ,भरत कुंकुलोल्,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,प्रवीण साळवे,राजेंद्र केदारी,पोपटराव शेळके,प्रमोद पत्की,बाळासाहेब सोनटक्के,पराग कारखानीस,शैलेंद्र भणगे,नितीन राऊत,संजय टेकाळे,सुरेश वाघुले,अण्णासाहेब राऊत,साहेबराव रक्टे,प्रकाश जाधव,चंद्रकांत परदेशी,सुनील शेळके,सोमनाथ परदेशी,श्रावण भोसले,नानासाहेब मुठे,कांतीलाल शिंदे,सोपान ननावरे,किरण सोनवणे,प्रेमनाथ सोनुने,शोभा शेंडगे,सविता साळुंके,पुष्पा शिंदे
सरपंच सौ. लहानुबाई दळे,उपसरपंच दिनकर बनसोडे,ग्रामसेवक प्रदीप आसने,पोलीस पाटील मधुकर बनसोडे,सोसा.चेअरमन विजय बनसोडे,तलाठी विजय लचोरे,मुख्याध्यापक राजू थोरात,व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील बनसोडे,पत्रकार संदीप बनसोडे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख,डॉ.असीम सय्यद आदींनी केले आहे.

