shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्र निमित्त करमाळ्यातील कमलाभवानी मंदिरात तीन दिवस कोरोना टेस्टिंग कॅम्प


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

  करमाळा: दि. ८  / करमाळा शहरातील जागृत श्री कमलाभवानी मंदिरात तीन दिवसांचा कोरणा टेस्टिंग कॅम्प लावण्यात आला आहे. दोन वर्षापासून बंद असलेले श्री कमला भवानी मातेचे मंदिर यावर्षी नवरात्र निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील साडे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोणा टेस्टिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

    नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण तालुक्यातून व बाहेर गावातून लोक येत असतात त्यामुळे नवरात्रात नऊ ते दहा दिवस भरपूर गर्दी असते. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कोरोना टेस्टिंग कॅम्प बरोबर कोरोनाचे लसीकरण ही येथे मंदिरात देण्यात येणार आहे.
 
   वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कोरोना टेस्ट कॅम्प तीन दिवस म्हणजे पहिली माळ, पाचवी माळ, व सातवी माळ, ( दि. ३/७/९ ) या दिवशी घेण्यात येणार आहे. या कॅम्प मध्ये अॅंटीजन टेस्ट व R.T.P.C.R. टेस्ट करण्यात येणार आहे आज दुपारपर्यंत २६/ जणांचे टेस्टिंग घेण्यात आले होते यात सर्वांचे रीपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

   या कोरोना टेस्टिंग कॅम्पची जबाबदारी  डॉ. पुंडे ( वैद्यकीय अधिकारी ),  ईश्वर त्र्यंबके ( आरोग्य सेवक ), दाऊद शेख  ( आरोग्य सेवक ), इत्यादी व्यवस्थितरित्या पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहे.
close