shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रातील पहिले भव्य वाचनालय "ऑलिम्पियन गोल्ड मेडलिस्ट सुभेदार नीरज चोप्रा क्रिडा वाचनालय" चे होणार उदघाटन

पुणे:- ४  /  "खेळातून सर्वागीण विकास"
 पुणे शहर व आपल्या विभागामध्ये खेळाचा प्रसार व प्रचार होऊन जास्तीत जास्त मुले व मुलींना खेळाची आवड निर्माण व्हावी , खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा व  या माध्यमातून सशक्त व सुदृढ नागरिक निर्माण व्हावेत आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः चे व राष्ट्रीय निती मूल्ये जोपासली जावीत अधिकाधिक प्राविण्य पदके मिळावीत म्हणून *श्रीमती लता काकू राजगुरू (कार्यशील नगरसेविका, पुणे म.न.पा.) यांच्या  संकल्पनेतून व अभिमन्यू सुर्यवंशी यांचा सहकार्याने माता रमाई आंबेडकर रोड हॉटेल डिलेक्स जवळ पुणे - १.या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील क्रीडा क्षेत्रातील पहिले भव्य  वाचनालय "ऑलिम्पियन गोल्ड मेडलिस्ट सुभेदार नीरज चोप्रा क्रिडा वाचनालय" चे उदघाटन मंगळवार दि. ५/१०/२०२१ रोजी सायं ठिक ६:०० वाजता होणार आहे तरी सर्व खेळाडू क्रिडा मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी, व सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे अशी  अभिमन्यू सुर्यवंशी संस्थापक आबईस् फाऊंडेशन‌‌ (रजि) अभिमन्यू स्पोर्ट्स अँकॅडमी (पुणे) यांनी विनंती केली आहे .
close