shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'शेतकरी एकसंघ होण्यासाठी जागा कधी होणार'?, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी : ऊस दराबाबत राज्य व केंद्र सरकारने ३ टप्यात एफआरपी देण्याचा घाट घातला.त्या विरोधातील लढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व शेतकरी एक एकवटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणी येथे काल शुक्रवारी शेतकरी मेळावा पार पडला.

मंगळवार दि. १२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत टाकळीमिया येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्याचीच पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्केट कमिटी सचालक सुरेश बानकर, विठ्ठल मोकाटे,डॉ. राजेंद्र बानकर, विजय बानकर आदींनी मनोगत व्यक्त करताना टाकळीमिया येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी ब्राम्हणी गावातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

जागर एफआरपीचा आराधना शक्तिपीठांची याप्रमाणे राज्य व केंद्र सरकारने तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा घाट घातला आहे. त्या निमित्ताने राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना जनजागृती करत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविद्र मोरे, युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, सतिष पवार प्रत्येक गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

निवडणूक काळात निवडण्यासाठी नको ते उद्योग करणारे राजकारणी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतात.त्यांना त्यांची आगामी निवडणुकीत जागा दाखविण्याची गरज आहे.सर्व क्षेत्रात संघटना काम करत असताना शेतकरी एकसंघ होण्यासाठी जागा कधी होणार? असा सवाल शेतकरी संघटनेचे मोरे यांनी केला.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600





close