प्रतिनिधी । योगिता तांबोळी :-
पुणे :- रेखा करण यांनी निर्मित केलेला लघुपट मागील वर्षांपासून अनेक फिल्म फेस्टिव्हल गाजवत आहे.या लघु चित्रपटाने ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटविले आहेत. महाराष्ट्रासह बिहार, केरळ, ता.नाडू, उ.प्रदेश, म.प्रदेश सह संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रशंसनीय ठरला आहे.
या चित्रपटात किरण नावाच्या मुलीची कहाणी आहे ही भुमिका "अक्षता कथुरिया" ने उत्तम रित्या साकारली आहे. जीवनात येणाऱ्या अनेक अडचणीं सोबत शिक्षणाचा मुलभूत हक्क तिच्या वडिलांकडून हिरावला जातोय. मुलगी आहे म्हणून तिच्या कला गुणांना डावलणारे बुरसटलेले विचार असणारे ,मुलगा- मुलगी बद्दल चा भेदभाव करणारी विचार सरणी असलेली भूमिका हर्षद पांचाळ यांनी हुबेहुब साकारली आहे.यात विशेष भूमिका चैतन्य ची आहे.
आजच्या काळात मोबाईल च्या आहारी विविध गेम मधे गुंतून आपले मानसिक संतुलन खराब करून घेणारा कलाकार "सोमण चौहान" आहे.चित्रपटाला सुरवातीलाच आकर्षण ठरलेल पात्र म्हणजे "चैतन्य" आहे 'उत्कृष्ट अभिनेता' पुरस्काराने देखिल पुरस्कार प्राप्त आहे. तसेच बालकलाकार ची भूमिका सम्राज्ञी परदेशी आणि सृष्टिराज कुरील यांनी नैसर्गिक रित्या पार पाडली आहे.
लेखिका,संपादक दिग्दर्शिका रेखा करण यांनी लघुचित्रपट इतक्या मार्मिक पद्धतीने उभे केले आहे की खरच आपल्या अवती-भोवती, दररोजच अश्या घटना घडत असतात परंतु प्रत्यक्षात दखल न घेता आपण दुर्लक्ष करत असतो. त्याचे परिणाम येथे हृदयस्पर्शी दिसू येत आहे. दोन वेगवेगळ्या विषयांचा समावेश करून त्यांचा जीवन प्रवास हा प्रेक्षकांना आकर्षित करणारा आहे.
भारत देश च नव्हे तर बार्सिलोना,जर्मनी, अमेरिका,इस्तानबुल, समवेत अनेक देशात पुरस्कार पटकाविले आहे.बेस्ट अॅक्टर, बेस्ट स्पोर्टिग अॅक्टर बेस्ट कॅरेक्टर, बेस्ट चाईल्ड अॅक्टर, सोशल मीडिया असे विविध पुरस्कार देखिल पटकावणारा हाच चित्रपट आहे.चित्रपट यशस्वी करण्यासाठी सरोज परदेशी ,छाया कलिके,सीमा परदेशी यांनी खूप मेहनत घेतली आहे.मोबाईल गेम चा अतिवापर मुलींचे शिक्षण सारखे ज्वलंत उदाहरण पालकांचे दुर्लक्ष नकळत घडणाऱ्या चूका अन त्याचे परिणाम या चित्रपटात मांडण्याचे प्रयत्न आहे.
उडान द ड्रीम प्रेक्षकांनी आवर्जून पहावा.युट्यूबवर हा चित्रपट सहज उपलब्ध आहे.,छायाचित्रण व सह दिग्दर्शन राॅबिन कुमार यांनी केले आहे.सिनेमॅटोग्राफर म्हणून उत्कृष्ट कामगीरी त्यांनी केली आहे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ, आर्थिक फायदा न बघता श्री.करन कुरील यांनी हे चित्रपट उत्कृष्ट रित्या चित्रीत केले आहे .त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. त्यांची समाज जागृतीची तळमळ या चित्रपटातुन खरच दिसत आहे.सर्वांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह हा चित्रपट नक्कीच पहावा. किरण च्या आईची भूमिका करणारे सुजाता कुलकर्णी पो्हेकर यांचा कोलम मिसिंग आहे. या सगळ्यांना कलाकारांना शिर्डी एक्सप्रेस परिवारातर्फे मनस्वी शुभेच्छा..!

