shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्याअध्यक्षतेखालीएरंडोल येथे मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत समन्वय समितीतर्फे एकल विधवा व अनाथ बालक यांची बैठक संपन्न..!


प्रतिनिधी। प्रमोद चौधरी
एरंडोल :- तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत समन्वय समितीतर्फे एकल विधवा व अनाथ बालके यांच्या साठी तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक  आयोजित करण्यात आली.
  स्वातंत्र्याच्या  अमृतमहोत्सवानिमित्त तहसील कार्यालय येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
कोरोणा मुळे आई वडील यांचे निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन योजना, L.I.C.जीवन विमा पॉलिसी च्या लाभ, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, शुभमंगल सामूहिक योजना,अंत्योदय योजना,तसेच अनाथ बालकाच्या प्रवेश , महिला व बालकांच्या मालमत्ताविषयक हक्क याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला, तिचे प्रमाणपत्र नसतील ते मिळवून देण्यासाठी समिती सर्व सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. 
 यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण यांचेसह महिला व बाल विकास अधिकारी तसेच कृषी विभाग शिक्षण विभाग पशुसंवर्धन विभाग पुरवठा विभाग संजय गांधी विभाग इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .80 पेक्षा अधिक महिलांना माहिती देण्यात आली.

close