प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
मांडवे : ६ / नगर तालुक्यातील मांडवे येथे आपलं गाव आपली जबाबदारी समजून येथील सरपंच सुभाषजी निमसे यांच्या प्रयत्नातून आज कोविशील्ङ डोस उपलब्ध करून ग्रामस्थांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
यामध्ये नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळुन रांगेत उभे राहुन सर्व नागरिकांचे ऑनलाईन नोंद
करून डोस देण्यात आले .
यावेळी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला
यावेळी सरपंच म्हणाले कि सर्व ग्रामस्थांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे . तसेच आपलं गाव आपली जबाबदारी समजून संपुर्ण ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे .
यावेळी उपसरपंच संजय रामदास निमसे ग्रा.पं.सदस्य अरूण निमसे वि .वि.कार्य.सेवा सोसा.चे संचालक विलासराव निमसे सर्व ग्राम. पं.सदस्य तसेच डॉ . पुनम दातिर मॅडम , सुनिता औटी आरोग्य सेविका मॅडम रायपेल्ली आरोग्य सेवक तसेच मनिषा उकिर्डे , आशा सेविका सविता निमसे, समाजसेवक व पत्रकार बाबासाहेब तिपुळे तसेच इतर कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते .

