shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत चमकदार कामगिरी ;महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थीनीचे उल्लेखनीय यश



प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

   करमाळा: दि. ८/ योग असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन खुली राज्यस्तरीय योगासन स्पर्धा दिनांक:25 ते 26 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पार पडली. त्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये आपल्या महात्मा गांधी विद्यालय करमाळा प्रशालेतील इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे या विद्यार्थीनी ने सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय ऑनलाईन  योगासन स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थीनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे हिने या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

  राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत विजय प्राप्त करुन तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयवंतराव जगताप साहेब, करमाळा नगरीचे नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त श्री शंभूराजे जगताप साहेब, संस्थेचे प्राचार्य कापले सर उपमुख्यध्यापक श्री बागवान ए. एच, पर्यवेक्षक श्री शिंदे एस. टी. पर्यवेक्षक श्री पाटील बी. के. संस्थेचे सचिव श्री तरकसे  एम. एस. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

त्या विद्यार्थीनी ला मार्गदर्शन करणारे नितीन शेळके सर आरजू पठाण, सागर शिरसकर , क्रीडा शिक्षक श्री दळवे एस. बी. श्री पवार व्ही. एल. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे व मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी आदिती जितेंद्र चांदगुडे हीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
close