shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे अब्दुल कलाम याचा जन्म दिवसा निमित्ताने वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा..!!

नगर प्रतिनिधी(शिवा म्हस्के)

नगर तालुक्यातील साकत खुर्द येथील  सार्वजनिक वाचनालयात  भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जी अब्दुल कलाम यांचा जन्म दिवसा  निमित्ताने वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता. अब्दुल कलाम यांना भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारा देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीही सबंध नव्हता. त्यांचा देशाला परिचय मिसाईल मॅन म्हणून आहे, त्यांनी १८ जुलै २००२ रोजी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून  डॉ.अब्दुल कलाम यांनी शपथ घेतली.  हा जन्म दिन शासनाच्या वतीने  वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो यांचे औचित्य साधून  आज साकत खुर्द या ठिकाणी  वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या गावचे सरपंच बापू केदारे यांनी आपले या वाचन दिना निमित्त तरुण वाचन आवर्जून केले पाहिजे वाचन हि काळाची गरज आहे.तसेच उपसंरपच बाबासाहेब चितळकर यांनी वाचन प्रेरणा दिन  छोट्याशा गावात दर वर्षी साजरा केला जातो हि गोष्ट अभिमानाची बाब आहे आवर्जुन सांगितले,


       




या वेळी उपसपंच बाबासाहेब चितळकर, सरपंच बापु केदारे ,श्रीधर पवार ,सुनिल पवार, किसन निमसे, बाबासाहेब तिखे.संजु गायकवाड. दादासाहेब पवार, ग्रंथपाल आनिल पवार, तसेच आदि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

close