शरदचंद्रजी पवार यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नंदिकेश्र्वर मंदिर निरवांगी येथे महाअभिषेक कार्यक्रमाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा सहत्र चंद्रदर्शन सोहळा निमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नंदिकेश्र्वर मंदिर निरवांगी येथे महाअभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास ज्यांनी सर्व समाजाला,महाराष्ट्राला, भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. अशा आपल्या दैवतास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करूयात यासाठी उद्या मंगळवार दि.१९ ऑक्टोबर २०२१ रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नंदिकेश्र्वर मंदिर निरवांगी येथे महाअभिषेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी इंदापूर तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठीक सकाळी ०८:१५ ला उपस्थित राहावे असे आव्हान इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,कार्याध्यक्ष अतुल झगडे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे (सर), युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ यांच्यावतीने करण्यात आली.

