*सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचे पालन करावे : अंकिता हर्षवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी:कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिर आणि धार्मिस स्थळं बंद होती. मंदिर व धार्मिस स्थळं कधी खुली करण्यात येणार याकडे आपल्या सर्वांचे लक्ष लागले होते. काल पासून म्हणजेच घटस्थापनेच्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिर व धर्मस्थळं खुले करण्यात आलीआहेत. त्यानिमित्ताने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व मंदिर - मंदिर परिसर स्वच्छता बाबत आज पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांनी बावडा येथील पद्मावती मंदिर येथे भेट देत नियोजनाचा आढावा घेतला.
धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसेच स्क्रिनिंगची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत फक्त अशाच व्यक्तींना व ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेले आहे त्यांनाच धार्मिक स्थळात प्रवेश मिळेल. काल पासून नवरात्री सुरू होत आहे त्यामुळे हजारो महिला व भक्त पद्मावती मंदिरास भेट देतील या दृष्टिकोनातून सर्व उपयोजना नियोजन योग्यरीत्या झाले आहे का याची अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. तसेच भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केले.

